नागपूर : मुंबै बॅकेत घोटाळा झालाय हे मान्य करतानाच घोटाळेबाजांवर आताच कारवाई करणं योग्य होणार नाही, असं सहरकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
बँकेतल्या ठेवींची संख्या जास्त आहे. त्यामुळे कारवाई केली तर ठेवीदारांचे नुकसान होईल, असं अजब स्पष्टीकरण पाटील यांनी दिले आहे. झी मीडियानेने मुंबै बँकेतला २७८ कोटींचा घोटाळा उघडकीस आणला होता.
याबाबत शिवसेनेचे प्रकाश सुर्वे यांनी प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना सहकारमंत्र्यांनी या प्रकरणाचा अहवाल सरकारला मिळाल्याचं सांगितले. विविध पंतसंस्थांना दिलेली कर्ज, मध्यप्रदेश औद्योगिक महामंडळास दिलेली व्याजमाफी, भाडेतत्वावर जागा घेणे, संगणक खरेदीमधील अनियमितता या चौकशीत समोर आली.
या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई केली जाईल, असं पाटील यांनी सांगितले. आरोपांची यादी मोठी असून याची चौकशी करून कारवाई केली जाईल, असं ते म्हणालेत. मात्र, कारवाई लवकर व्हावी अशी मागणी सुर्वे यांनी केली आहे.
दरम्यान, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी सहकार मंत्र्यांच्या या स्पष्टीकरणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. चौकशी पूर्ण झाली असेल, तर कारवाई करण्यात विलंब का, असा सवाल त्यांनी केलाय.
प्रश्न १ -
बँकेतील घोटाळा झी 24 तासनं उघडकीस आणली होता. बँकेचे अध्यक्षच सत्ताधारी भाजपमध्ये आहेत. त्यामुळं कारवाई करण्यात दिरंगाई होतेय का ?
प्रश्न २ -
नाबार्ड आणि आरबीआय या सारख्या यंत्रणांकडून कारवाईच्या सुचना झालेल्या असताना देखील सरकारकडून कारवाई नाही. सहकारमंत्र्यांनी कारवाईबाबत अजब उत्तर दिलंय.