नवी मुंबई : नवी मुंबईतल्या एम जी एम शाळेवर पालकांनी मोर्चा काढला होता. या शाळेतल्या विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाप्रकरणी पालकांनी निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं.
शाळेतील शिक्षक शिवशंकर शुक्लावर कठोर कारवाईची मागणी यावेळी पालकांनी केलीय. यासाठी पालकांनी मोठ्या संख्येनं शाळेबाहेर हजेरी लावलीय.
यावेळी शाळा प्रशासन आणि शिक्षकाविरोधात पालकांनी जोरदार घोषणाबाजी केली. वारंवार तक्रार करूनही शाळा प्रशासनाकडून कारवाई केली जात नव्हती त्यामुऴेच ही वेळ आल्याचं यावेळी पालकांनी म्हटलंय.
दरम्यान, नेरूळ एम जी एम हायस्कूलमधील विद्यार्थिनी लैंगिक शोषण प्रकरणी तपास करणारे नेरूळ पोलीस ठाण्याचे ए पी आय वासुदेव मोरे यांच्याकडून तपास काढून क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत यांच्याकडे देण्यात आलाय. तर वासुदेव मोरे यांची चौकशी क्राईम ब्रँच करणार आहे.
त्याचप्रमाणे फरार शिक्षकाला अटक करण्यासाठी स्पेशल टीम उत्तरप्रदेशात पाठवण्यात आलीय. त्याचप्रमाणे उद्या शिवसेना शाळेवर मोर्चा काढणार असून, त्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे