मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीचं जहाज आता बुडण्याच्या स्थितीत असल्यामुळेच अनेक जण जबाबदारी टाळतायत किंवा पक्ष सोडत असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलीय.
नाराज नारायण राणेंच्या मनधरणीला दुस-या दिवशीही काँग्रेसला अपयश आलंय. मात्र येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसह माणिकराव आणि राणे पक्षाध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. त्यामुळं राणेंच्या राजीनाम्याचा चेंडू सोनिया गांधींच्या कोर्टात गेलाय. राणेंचं मन वळण्यासाठी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी वर्षा बंगल्यावर बैठक घेतली. मात्र दोन तास चाललेल्या या चर्चेतून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळं तोडग्याविनाच आजची बैठक गुंडाळावी लागली.
आपण उपस्थित केलेल्या मुद्यांवर बैठकीतल्या चर्चेतून आपलं समाधान झालेलं नाही. त्यामुळं आपला मंत्रिपदाच्या राजीनाम्याचा निर्णय कामय असल्याचं राणेंनी स्पष्ट केलंय. मात्र चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी मात्र राणेंच्या नाराजीबाबत तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.