मुंबई : भाजपने जोरदार मुसंडी मारल्याने शिवसेनेला अपेक्षित असलेला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. शिवसेनेने आपला गड राखला. याचा आनंद शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये ओसंडून वाहतोय. त्यात भर पडली ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कल्याणमध्ये येणार असल्याची वृत्ताची. मात्र, बहुमत न मिळाल्याने उद्धव यांचा दौरा अचानक रद्द झालाय.
शिवसेनेला बहुमताचा जादूई ६३ आकडा गाठता आला नाही. ५२ जागा जिंकल्याने १० जागा कमी पडल्यात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा कल्याण-डोंबिवली दौरा तूर्त पुढे ढकलाला आहे. उद्धव सध्यातरी मातोश्रीवरच आहेत. उद्धव यांच्या ऐवजी खासदार अनिल देसाई, आदेश बांदेकर कल्याण-डोंबिवलीकडे रवाना झालेत.
दरम्यान, 'मातोश्री' बाहेर कलानगर प्रवेश द्वारावरचा शिवसैनिकांचा ढोल-ताशाचा जल्लोष पॅकअप झाला. फटाक्यांची माळ गुंडाळली गेली. त्यामुळे या नाराजी मागचे कारण बहुमत नसल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे आता सेनेला सत्तास्थापनेसाठी जुळवाजुळव करावी लागत आहे. गुप्त खलबते सुरु झाली आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.