मुंबई : मुंबईच्या विलेपार्ले परिसरात 24 वर्षीय महीला डॉक्टरचा हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. श्रद्धा पांचाळ असं या तरूणीचं नाव आहे.
आज पहाटे राहत्या घरातच श्रद्धाचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळल्यानं बलात्काराचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. श्रद्धा पांचाळ ही फिजीओथेरेपिस्ट असून आपल्या आई वडिलांसह विलेपार्लेच्या श्रद्धानंद रोडवरील लीलाबाई चाळीत राहायला होती.
सोमवारी रात्री 12 च्या सुमारास झोपायला श्रद्धा वरच्या खोलीत गेली. रात्री साडे तीनच्या सुमारास वरच्या मजल्यावर धूर येऊ लागला. शेजाऱ्यांनी पाहणी केली असता श्रद्धाची खोली बाहेरून बंद होती. दरवाजा उघडून आत गेल्यानंतर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली.
आत श्रद्धाचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला. पँटनं गळा आवळून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आग लावून घराचं दार बाहेरुन कडी लावून बंद करण्यात आलं होतं. जेव्हा धूर पसरला तेव्हा आसपासच्या लोकांनी ते घर उघडले तेव्हा लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना श्रद्धाचा शरीर विवस्त्र अवस्थेत होता
श्रद्धाचा मृतदेह शवविच्छेदनासाटी रुग्णालयात पाठवण्यात आला असून विलेपार्ले पोलीस तसेच गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहेत.