मुंबई: राज्य सरकारनं आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. सिगरेट, विडी, दारुवर पाच टक्के अतिरिक्त कर लावला जाणार आहे. दुष्काळनिधीसाठी सिगरेट, विडी, दारु, शितपेय, पेट्रोल, डिझेलवरील कर वाढवला असल्याचं सरकारनं सांगितलंय.
तर पेट्रोल, डिझेलवर प्रतिलिटर दोन रुपये वाढवण्यात येणार आहे. त्याचवेळी पेट्रोल-डिझेलवरील एलबीटी रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात फारसा फरक पडणार नाही.
उद्यापासून ही दरवाढ लागू होणार आहे. पुढील पाच महिन्यांसाठी ही वाढ असेल. सरकारला यामधून 1600 कोटींचा महसूल मिळण्याचा अंदाज आहे.
मंत्रिमंडळाचे निर्णय -
- हिरे, सोनेच्या दागिन्यांवरील एक टक्का व्हॅट वाढून 1.20 % केला जाणार आहे.
- इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मास कम्युनिकेशन्स या स्वायत्त संस्थेला अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे 6 हेक्टर जागा देण्याचा निर्णय
- केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थान यांना पश्चिम विभाग केंद्रीय इलेक्ट्रीकल टेस्टिंग लॅबसाठी नाशिक जिल्ह्यातील मौजे शिलापूर येथील 100 एकर जमीन
- मुंबई महापालिका अधिनियम, महाराष्ट्र महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय
- जात पडताळणी समितीकडे अर्ज केल्याचा पुरावा जोडून निवडणूक लढविणारा बोगस उमेदवार सहा वर्षांसाठी निवडणुकीस अपात्र ठरणार
- ग्रीन एनर्जी कॉरिडॉर योजनांमधून 2570 मे.वॅ. अतिरिक्त वीज उपलब्ध होणार
- 20% खर्च राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या निधीतून, 40% नॅशनल क्लीन एनर्जी अनुदान तर 40% कर्ज जर्मन डेव्हलपमेंट बँकेकडून घेण्यास मान्यता
- 27 पारेषण योजना ग्रीन एनर्जी कॉरिडॉर कार्यक्रमांतर्गत राबविण्यास मान्यता, 367 कोटींचा अंदाजित खर्च
- बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण अंतर्गत उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालिन निदेशकांचे पॅनल तयार करण्याचा निर्णय
- 100 हून अधिक पटसंख्या असलेल्या 1835 शाळांमध्ये कला, शारीरिक शिक्षण, आरोग्य, कार्यानुभव यासाठी अतिथी निदेशकांचे पॅनल तयार करणार
'अमृत' अभियानाला मंजुरी
केंद्राच्या महत्त्वाकांक्षी अटल मिशन फॉर रिज्युव्हेनशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन(अमृत) अभियानाची राज्यात अंमलबजावणी करणार,43 शहरांचा समावेश.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 30, 2015
यात केंद्राच्या महत्त्वाकांक्षी 'अमृत' अभियानाचा समावेश आहे. या अभियानासाठी राज्यातील 43 शहरांचा समावेश करण्यात आलाय.
अटल मिशन फॉर रिज्युव्हेनशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) योजना आहे. या योजनेसाठी उद्गीर,धुळे,चंद्रपूर,अमरावती,अचलपूर,पनवेल,गोंदिया,यवतमाळ,उस्मानाबाद,नंदूरबार,वर्धा,हिंगणघाट आणि नागपूर या शहरांचा समावेश
मालेगाव, नगर, जळगाव, भुसावळ, सोलापूर, बार्शी, सातारा, सांगली-मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी, औरंगाबाद, परभणी, जालना, नांदेड, बीड, अकोला, लातूर, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मिरा भाईंदर, नवी मुंबई, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक या शहरांचा समावेश करण्यात आलाय.
आणखी वाचा - पेट्रोल डिझेल २ रुपयांनी महाग होणार
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.