मुंबई: भू संपादन विधेयकाला शिवसेनेचा विरोध कायम आहे. दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेत या विधेयकावर चर्चा केली होती. मात्र या भेटीनंतरही या विधेयकाबाबतचा तिढा कायम असल्याचं चित्र आहे.
भूसंपादन विधेयकामध्ये ज्य़ा गोष्टींवर शिवसेनेला आक्षेप आहे त्या सरकारला लेखी कळवणार असल्याचं सुभाष देसाई म्हणाले. विधेयक संसदेत आणण्यापूर्वी केंद्रीय मंत्री शिवसेनेशी चर्चा करण्यास का आले नाहीत? असा देसाईंचा आक्षेप आहे.
“मोठ्याने ओरडल्याशिवाय कोणाला ऐकायला जात नाही, मात्र शिवसेनेचा आवाज पूर्वीपासूनच बुलंद आहे. त्यामुळे भू संपादन विधेयकाविरोधातही हा आवाज असाच असेल”, असंही देसाई यांनी ठणकावलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.