राज्यात कर वसुली पोहोचली ८४१ कोटींवर

महानगरपालिका आणि नगरपालिकांचे विविध कर भरण्यासाठी एक हजार आणि पाचशे रुपये मुल्यांच्या व्यवहारातून रद्द झालेल्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येत आहे. नागरीकांनी या संधीचा लाभ घेऊन राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांकडे विविध करांपोटी गेल्या सहा दिवसात एकूण ८४१ कोटीहून अधिक रुपयांचा भरणा केला आहे. 24 नोव्हेंबरपर्यत जुन्या चलनाने सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या कार्यालयात कर स्वीकारण्यात येणार आहे. तरी नागरीकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या मालमत्तांचा कर आणि थकबाकी भरावी. असे आवाहन नगरविकास विभागाने केले आहे.

Updated: Nov 17, 2016, 11:42 PM IST
राज्यात कर वसुली पोहोचली ८४१ कोटींवर title=

मुंबई : महानगरपालिका आणि नगरपालिकांचे विविध कर भरण्यासाठी एक हजार आणि पाचशे रुपये मुल्यांच्या व्यवहारातून रद्द झालेल्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येत आहे. नागरीकांनी या संधीचा लाभ घेऊन राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांकडे विविध करांपोटी गेल्या सहा दिवसात एकूण ८४१ कोटीहून अधिक रुपयांचा भरणा केला आहे. 24 नोव्हेंबरपर्यत जुन्या चलनाने सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या कार्यालयात कर स्वीकारण्यात येणार आहे. तरी नागरीकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या मालमत्तांचा कर आणि थकबाकी भरावी. असे आवाहन नगरविकास विभागाने केले आहे.

८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्रीपासून एक हजार आणि पाचशे रुपये मुल्यांच्या नोटा व्यवहारातून रद्द झाल्या आहेत. राज्यातील महानगरपालिका, नगरपालिकांच्या विविध करांचा भरणा, थकबाकी भरण्यासाठी 24 नोव्हेंबरपर्यंत नागरीकांकडून या जुन्या चलनाच्या नोटा स्वीकारण्यात येणार असल्याने राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिकांच्या कार्यालयात मालमत्ताधारक मोठया प्रमाणात गर्दी करीत आहे.             

महानगरपालिकानिहाय जमा झालेली रक्कम - रुपये 
१६ नोव्हेंबरपर्यंत जमा झालेली रक्कम

बृहन्मुंबई महानगरपालिका    191 कोटी 41 लाख
नवी मुंबई महानगरपालिका    29 कोटी 72 लाख
कल्याण-डोबिंवली महानगरपालिका    32 कोटी 99 लाख
मीरा-भाईंदर महानगरपालिका    29 कोटी 9 लाख
वसई- विरार महानगरपालिका    12 कोटी 44 लाख
उल्हासनगर महानगरपालिका    26 कोटी 68 लाख
पनवेल महानगरपालिका    4 कोटी 30 लाख
भिवंडी-निजामपूर महानगरपालिका    12 कोटी 39 लाख
पुणे महानगरपालिका    101 कोटी 77 लाख
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका    28 कोटी 40 लाख
ठाणे महानगरपालिका    30 कोटी 50 लाख
सांगली-कुपवाड महानगरपालिका    11 कोटी 85 लाख
कोल्हापूर महानगरपालिका    6 कोटी 13 लाख
अहमदनगर महानगरपालिका    6 कोटी 53 लाख
नाशिक महानगरपालिका    16 कोटी 67 लाख
धुळे महानगरपालिका    8 कोटी 78 लाख
जळगांव महानगरपालिका    8 कोटी 5 लाख
मालेगांव महानगरपालिका    5 कोटी 37 लाख
सोलापूर महानगरपालिका    18 कोटी 52 लाख
औरंगाबाद महानगरपालिका    9 कोटी 4 लाख
नांदेड-वाघाळा महानगरपालिका    9 कोटी 66 लाख
अकोला महानगरपालिका    3 कोटी 54 लाख
अमरावती महानगरपालिका    9 कोटी 25 लाख
नागपूर महानगरपालिका    13 कोटी 37 लाख
परभणी महानगरपालिका    52 लाख
लातूर महानगरपालिका    4 कोटी 40 लाख
चंद्रपूर महानगरपालिका    3 कोटी 38 लाख 
राज्यातील सर्व नगरपालिका 
(नगरपालिका प्रशासन संचालनालय)    130 कोटी 64 लाख