राजीव गांधी योजनेचे नाव बदलण्याचा निर्णय

राज्यातल्या एका योजनेचं नाव बदलण्याचा तर एक नवी योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. राजीव गांधी जीवन विमा योजनेचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

Updated: Jun 7, 2016, 11:19 PM IST
राजीव गांधी योजनेचे नाव बदलण्याचा निर्णय title=

मुंबई : राज्यातल्या एका योजनेचं नाव बदलण्याचा तर एक नवी योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. राजीव गांधी जीवन विमा योजनेचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

या योजनेचं नवं नाव महात्मा पुले जनआरोग्य विमा योजना असं केलं जाईल. राजीव गांधी जीवन विमा योजनेचा करार नोव्हेंबर २०१६ ला संपतोय. त्यामुळं नव्या नावासह आणि अधिक सुविधांसह ही योजना राबवली जाणार आहे. तर बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना या नावानं नवी विमा योजना सुरू करण्यात येणार आहे. 

यामध्ये रस्ते अपघातातील जखमींना विमा योजनेच्या माध्यमातून ३० हजारांपर्यंत मदत केली जाणार आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी याची माहिती दिलीय.