www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवनसेनेत असताना ज्यांनी टोलवसुलीला सुरूवात केली तेच आता टोलला विरोध करत आहेत, असा टोला आज राज ठाकरे यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला. टोल बंद झाले तर सरकारकडे निधी आल्यावरच रस्त्याची कामं करावी लागतील, असंही भुजबळ यांनी म्हटलंय.
नवी मुंबईतल्या एका कार्यक्रमात रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलविरोधी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर. टोल नाक्यावर टोल भरू नका, कोणी आडवे आले तर फोडून काढा असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. त्यानंतर रात्रीपासूनच टोलनाके फोडण्यास सुरूवात झाली.
टोलफोडीचं हे सत्र मुंबई ठाण्यातून पुणे, नागपूर आणि औरंगाबादपर्यंत पोहचलं. मनसे कार्यकर्त्यांनी टोलविरोधात संताप व्यक्त करत टोलनाक्यांना लक्ष्य केलं. एकूणच काय टोलविरोधी मनसेनं पुकारलेलं युद्ध पेटण्याची चिन्हं आहेत. टोलविरोधी जनभावना लक्षात घेऊन टोल न भरण्याचा मुद्दा जरी योग्य असला तरी अशी तोडफो़ड आणि हिंसा नक्कीच समर्थनीय नाही.
पाहा व्हिडिओ
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.