मुंबई : कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर २,३ आणि ४ सप्टेंबर रोजी टोल सूट दिली जाणार आहे. यासाठी स्थानिक वाहतूक पोलिस आणि 'आरटीओ'मधून काही दिवस आधी पास मिळणार आहे.
यासाठी संबंधितांनी वाहन क्रमांक, स्थानिक पत्ता याबाबत पुरावा आणि कोकणात जाणाऱ्या घराचा पत्ता अशी माहिती दाखल करावी लागेल, या पास धारकांना मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर टोल सूट मिळणार आहे.