रिसर्च स्कॉलर विशाल कडणे यांची पद्मश्रीसाठी दुसऱ्यांदा शिफारस

२६ जानेवारी रोजी प्रतिवर्षी घोषित करण्यात येत असलेल्या भारत देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक अशा पद्मश्री पुरस्कारासाठी युवा मराठी मुंबईकर इंजिनिअर विशाल विजय कडणे यांची शिफारस राज्यसभा सदस्यामार्फ़त केली आहे. 

Updated: Dec 11, 2015, 06:11 PM IST
रिसर्च स्कॉलर विशाल कडणे यांची पद्मश्रीसाठी दुसऱ्यांदा शिफारस  title=

मुंबई : २६ जानेवारी रोजी प्रतिवर्षी घोषित करण्यात येत असलेल्या भारत देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक अशा पद्मश्री पुरस्कारासाठी युवा मराठी मुंबईकर इंजिनिअर विशाल विजय कडणे यांची शिफारस राज्यसभा सदस्यामार्फ़त केली आहे. 

विशाल हे स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग तज्ञ असून गेले एक दशक आपल्या विविध रिसर्च आणि तांत्रिक कौशल्याने देशाची सेवा करत आहेत.त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत अमेरिकेने २०१३ साली कडणे यांना उत्तम कामगिरी श्रेणीची वर्गवारी देऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवले. त्यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल भांडूप भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

IIT ची GATE पात्र केली तीसुद्धा सामान्य ओपन वर्गावारीतूनच. विशाल हे महाराष्ट्राचे मूळ रहिवाशी असून वास्तव्यास मुंबईत असतात. आजपर्यंत त्यांनी पर्जन्य जल संधारण, हॉट रोलड स्टील, कोल्ड रोलड स्टील, लिक्विफ़ेक्शन रेसिस्टस ऑफ सोईल, Durability ऑफ Concrete, Structural ऑडीट अशा अनेक महत्वाच्या अभियांत्रिकी विषयावर महत्वपूर्ण योगदान दिले आहे. 

पर्जन्य जलसंधारण या विषयावर इंजि. विशाल यांनी केलेला प्रबंध २००५ साली तत्कालीन महापौर दत्ता दळवी यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेला प्रदान करण्यात आला. लिक्विफ़ेक्शन रेसिस्टस ऑफ सोईल ह्या भूकंप निगडीत विषयावर काम करत असताना  विशाल यांना मुंबई विद्यापीठाने सदर विषयावर रिसर्च स्कॉलर म्हणून PhD करण्यास मान्यता दिली. 

COncrete विषयावरील त्यांच्या अनेक प्रबंधाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. एका युवा सुशिक्षित अभियंत्याची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस झाल्याने सर्व युवा वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

गेल्यावर्षी देखील विशाल विजय कडणे यांची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस झाली होती, मात्र ती संधी हुकल्याचे आपल्याला दुख नसून ह्यावर्षी पुन्हा माझा विचार होता असल्याने मला आनंदच होत आहे असे कडणे यांनी सांगितले. 

तसेच अधिक जोमाने मी राष्ट्र सेवेला स्वताला झोकून देइन अशा राष्ट्रप्रेमाचा आशावाद रिसर्च स्कॉलर विशाल कडणे याने व्यक्त केला. एका रिसर्च स्कॉलरचा पद्मश्री पुरस्कारासाठी विचार झाल्याने नवीन नवीन technology वर भर देऊन सतत प्रगतीशील असण्याकरता सदैव प्रयत्नशील असलेल्या फडणवीस आणि मोदी सरकारचे समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.