www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आतापर्यंत तुम्ही ऐकलं असणार की विदेशातून कस्टम ड्यूटी वाचविण्यासाठी अनेकजण बेकायदारितीनं दागिने आणतात. मात्र, तुम्ही कधी असं ऐकलं आहे का की एखादं अरबपतीही असं कृत्य करु शकतो. तुमचा विश्वास बसणार नाही पण असं मुंबईत घडलंय. ‘सियाराम सिल्क मिल्स’ घराण्यातील सुनेनं हा प्रताप केलाय.
‘डायरोक्टरेट ऑफ रेव्हन्यू इंटेलिजेंस’ म्हणजेच डीआरआयने प्रसिध्द कापड निर्माती कंपनी ‘सियाराम सिल्क मिल्स’चे डायरेक्टर अभिषेक पोतदारची पत्नी विह्यारी पोतदार हिला तस्करीच्या आरोपाखाली अटक केलीय. गेल्या मंगळवारी फ्लाईट एसक्यू-४२६ ने सिंगापूरहून मुंबईला परत येत असताना विह्यारी पोतदारला मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. डीआरआयच्या म्हणण्यानुसार, विह्यारी पोतदारने विमानतळावरील तपासणीच्या दरम्यान आपल्या आंतवस्रांमध्ये सोने आणि हिऱ्याचे दागिणे लपविले होते. ती हे सर्व दागिने बेकायदारितीनं भारतात आणत होती.
सिंगापूरमधील ‘विह्यारी ज्वेल्स प्राय़वेट लिमिटेड’ची डायरेक्टर असलेल्या विह्यारी पोतदारकडून तपास अधिकाऱ्यांना २ कोटी ३५ लाख किमतीचे हिरे आणि १० लाख रुपये किंमतीची घड्याळ हस्तगत करण्यात यश मिळालंय. एव्हढंच नाही तर ग्रॅंड हयात या पंचतारांकित हॉटेलमधल्या त्यांच्या शोरुमची झडती घेतली असता त्यामधून चार कोटीचे दागिनेसुद्दा हस्तगत करण्यात तपास अधिकाऱ्यांना यश मिळालंय. न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने विह्यारी पोतदार यांची जामीन याचिका फेटाळून लावलीय. त्यामुळे पुढचे दहा दिवस आता विह्यारी पोतदारला तुरुंगातच काढावे लागणार आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.