मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकातूनही शिवसेना-भाजप युतीच्या फुटीचे सूतोवाच करण्यात आलेत. दिल्ली तुमची, महाराष्ट्रात सत्ता आमचीच या मथळ्याखाली आलेल्या वृत्तात शिवसेनेकडून युती संपल्याचे सूतोवाच करण्यात आलेत..
रंगशारदा इथे शिवसेनेचा महाकार्यकारिणी मेळावा झाला. या मेळाव्यातही महायुती तुटल्याचंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालंय. गोध्रा जळीतकांडानंतर देशात मोदीविरोधी लाट होती. पण निव्वळ बाळासाहेबांमुळेच नरेंद्र मोदींचं पद शाबूत राहीलं याची आठवण उद्धव यांनी करून दिली. तर जागावाटपात आम्ही देणारे आहोत घेणारे नाही असंही भाजपला सुनावलं. उद्धव यांच्या तोंडी असलेली ही भाषा महायुती टिकावी यासाठीची नाही तर महायुती तुटल्याचीच साक्ष देणारी होती.
शिवसेना आणि भाजपमधील युतीला तडे गेलेत. रविवारी मुंबईत वांद्रे इथं रंगशारदा सभागृहात मेळावा घेऊन शिवसेनेनं आपला अखेरचा फॉर्म्यूला भाजपला सादर केला. आपल्याया युती टिकवायची आहे. ही युती हिंदुत्वासाठी झाली आहे सत्तेसाठी नव्हे असं सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी भाजपनं 119, शिवसेनेनं 151 आणि घटकपक्षांनी 18 जागा लढवाव्यात असा शेवटचा प्रस्ताव भाजपला सादर केला. तर भाजपनं त्यात नविन काय असं म्हणतं तो धुडकावून लावला. चर्चा करायची असेल तर समोरासमोर करा मीडियासमोर नव्हे असा टोलाही भाजपनं लगावलाय. युतीला तडे गेलेत असं वृत्त झी २४ तासनं सर्वप्रथम दिलं होतं..
राज्याच्या किंबहुना देशाच्या राजकारणात महत्त्वाचा ठरावा असा हा आजचा दिवस. कारण आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसंदर्भात आज घडामोडी घडणार आहेत. युती-आघाडी मोडण्याची अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे किंवा घोषणा न होताच युती मोडण्याची चिन्हं आहेत. त्यामुळं राजकीय उलथापालथीचा आजचा दिवस असण्याची शक्यता आहे.
शिवसेना आणि भाजपमधील युती तुटण्यापर्यंत ताणली गेलीय. दोन्ही बाजुंकडून 25 वर्षातल्या युतीचे हिशोब मांडले जाताहेत आणि कोण कुठल्या प्रसंगात कसं वागलं याचा पाढा वाचला जातोय. भाजप नेते सुधीर मनगुंटीवर यांनी भाजपची बाजु जाहीरपणे मांडली तर त्याता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी जाहिर उत्तर दिललयं.
महायुतीत शिवसेना आणि भाजपमधील जागावाटपाचा तिढा सुटत नसल्यानं घटक पक्षांनीही आता स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत. युतीतील शिवसेना आणि भाजपचा वाद संपला नाही तर आम्हालाही वेगळा निर्णय घ्यावा लागेल असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी म्हंटलय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.