www.24taas.com, नाशिक
पत्नीच्या संशयास्पद मृत्यूनंतर 24 तासात पतीनेही आत्महत्या केल्याची घटना घडलीये. नाशिकच्या श्रमिकनगर परिसरात प्रशांत पाटील या 32 वर्षींय व्यक्तीनं गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवलीये. पत्नीच्या मृत्यूचे गुढ कायम असतानाच पतीनं आत्महत्या केल्यानं तर्कवितर्क लढवले जातायेत.
प्रशांत पाटीलची पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या पत्नी चित्रा हिनं परभणीमध्ये आत्महत्या केली. पोलीस मुख्यालयातल्या पोलीस क्वार्टरसमध्ये चित्रा पाटील हिचा मृतदेह आढळला आहे. चित्रा पूर्णा पोलीस ठाण्यात कार्यरत होती.
सकाळी ड्युटीसाठी न आल्यानं शेजारी राहत असलेली बहिण उठवण्यास गेली असता ही घटना उघडकीस आली. चित्राच्या शरीरावर गळफास आणि कोणत्याही जखमेच्या खुणा आढळलेल्या नाहीत. त्यामुळं ही हत्या की आत्महत्या हे पोस्टमार्टम अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.