www.24taas.com, झी मीडिया, अहमदनगर
आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही जोरदार दणका दिलाय.
दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी केजरीवालांच्या आम आदमी पक्षाला लागणारा निधी गोळा करण्यासाठी अण्णांच्या नावाचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी हजारेंकडे आल्या आहेत. त्यामुळं व्यथित झालेल्या अण्णांनी केजरीवालांना खरमरीत पत्र पाठवून जाब विचारला आहे.
निवडणूक निधी गोळा करण्यासाठी माझ्या नावाचा वापर करणं योग्य नाही, असं सांगतानाच रामलीला मैदान आणि जंतरमंतर आंदोलनाच्या वेळी माझ्या नावानं जमा केलेल्या पैशांचा हिशेबही आपण दाखवलेला नाही, असा भडिमार अण्णांनी केलाय.
आंदोलनासाठी जमा केलेला पैसा आंदोलनावरच खर्च व्हावा, निवडणुकीसाठी नाही, असा टोला अण्णा हजारेंनी लगावलाय. तर अरविंद केजरीवाल यांनी या पत्राला पाठवलेल्या उत्तरामध्ये, अण्णा हजारेंचे सर्व आक्षेप अमान्य केले आहेत. जनलोकपाल आंदोलनासाठी गोळा केलेल्या निधीच्या हिशेबाची न्या. हेगडे यांच्यामार्फत चौकशी करावी. या चौकशीत हिशेबात हेराफेरी झाल्याचे उघड झाल्यास दिल्ली विधानसभा निवडणुकीत मी आपील उमेदवारी मागे घेईन, अशी घोषणा केजरीवाल यांनी केलीय.
एवढंच नव्हे तर हे आरोप खोटे असल्याचं चौकशीत सिद्ध झाल्यास अण्णांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दिल्लीला यावं, असंही केजरीवाल यांनी सांगितलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.