www.24taas.com,नाशिक
दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी मित्रांनी मित्राचीच हत्या केल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आलीये. सनी ऊर्फ संजीवकुमार नरेशकुमार अग्रवाल असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.
अवघ्या 50 हजारांसाठी कंपनीत सोबत काम करणार्याह मित्राची हत्या आणि त्यानंतर दोन महिन्यांनी त्याच्याच कुटुंबीयांकडून न कोटी रुपये खंडणीची मागणी करणार्या दोघांना गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे .
पोलीस अजून एका जणाला पकडण्याचाप्रयत्न करत आहेत. या घटनेमुळे पैसा कमवून श्रीमंत आयुष्य जगण्यासाठी एका मुलाला त्याच्या आईसह पकडण्याची घटना ताजी असताना तरुणांचा पैसा कमविण्याच्या हव्य्सापोती आता अपहरण,खंडणी आणि वेळप्रसंगी खूनही करू लागल्याच समोर आलं आहे. या घटनेत सनी ऊर्फ संजीवकुमार नरेशकुमार अग्रवाल याची हत्या करण्यात आली.
सनी हा सातपूर येथील एशियन इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत कामास होता. कंपनीच्या व्यवस्थापकासोबत तो महात्मानगर भागातील एका इमारतीत राहात होता.याच इमारतीत हत्या करून तिघा जणांनी सनीचा मृतदेह टीव्हीच्या खोक्यात नेऊन मुंबई महामार्गावरील वाडीवऱ्हे येथे फेकला ऑगस्ट महिन्यात फेकला होता.
अनोळखी मृतदेह सापडल्याची तशी नोंद वाडीवऱ्हे पोलिसात करण्यात आलेली आहे. हत्या झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे आमच्या मुलाचे अपहरण करून कुणीतरी खंडणीची मागणी करत असल्याच्या दिलेल्या तक्रारीवरून हा प्रकार उघडकीस आला आहे.