पिंपळगावच्या टोलनाक्यावर `महिलाराज`

राज्यात महामार्गावरील टोलवसुली आणि त्यावर हल्ले हे नेहमीचेच..मात्र हेच संवेदनशील असलेले टोल नाके आता महिलानी चालविले तर...

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 21, 2013, 09:31 PM IST

www.24taas.com, नाशिक
राज्यात महामार्गावरील टोलवसुली आणि त्यावर हल्ले हे नेहमीचेच..मात्र हेच संवेदनशील असलेले टोल नाके आता महिलानी चालविले तर... अशक्य असलेली ही वसुली नाशिकमध्ये होते आहे..मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव टोलनाका संपूर्णपणे महिला चालवीत आहेत.
पैश्यांच्या या व्यवहारावर लक्ष ठेवणारी सुपरवायझर आहे अर्चना पवार. ही कुठे बँकेत काम करत नाहीये...तर वर्दळीच्या आणि सर्वांधिक धोकेदायक असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावर ट्रकचालकावर लक्ष ठेवते आहे..निफाड तालुक्यातील कोकणगाव यां गावाची ही कन्या यापूर्वी घरात चूल आणि मूल याच्या चौकटीत अडलेली होती...बारावी शिकलेल्या अर्चनाचा या नोकरीने आत्मविश्वास दुणावला आहे.टोलवर काम करत असल्याने आज सबला झाली आहे.
नाशिकपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या ह्या टोलचा कारभार केवळ महिला चालवितात,, महिलांनी चालविलेला राज्यातील या एकमेव टोलनाक्यावर अर्चनासारख्या शंभराहून अधिक मुली काम करतायेत . टोल वसूल करणाऱ्या या महिला केवळ सुपरवायझर नव्हे, तर व्यवस्थापक आणि नियंत्रकसुद्धा महिलाच आहेत...हे चित्र केवळ दिवसाचंच नाही तर रात्री बेरात्री सुद्धा तीनही शिफ्टमध्ये काम करतायेत. त्यांच्या सुरक्षेसाठी सर्व प्रकारच्या अत्य्धुनिक सुविधा या ठिकाणी पुरविण्यात आल्या आहेत. कफेटरिया, आरामकक्ष तसचं आरोग्यसुविधा असल्याने त्यांचा आत्मविश्वास आता चांगलाच दुणावला आहे.

महिलांची सुरक्षितता त्यांच्या आत्मविश्वासात आहे. त्यांना खऱ्या अर्थाने सबला करावयाचे असेल तर कायदे करन्याबरोबरच अशा संधी मिळण्याची गरज आहे.