www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर देशभरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्ना संदर्भात ओरड झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी हेल्पलाईन सुरु केली. या हेल्पलाईनवर आलेल्या महिलांच्या तक्रारी या बहुतेक घरगुती हिंसाचारासंदर्भातल्या आहेत.
दिल्लीतल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर नाशिक पोलीस आयुक्तालयानं महिलांसाठी हेल्पलाईन सुरु केली आणि महिलांच्या तक्रारी दाखल करून घेण्यासठी नियंत्रण कक्ष सुरु केला. पोलीस आयुक्तालय हद्दीत महिलांच्या सुरक्षेसाठी रात्री गस्त घालणारी व्हॅन सुरू करण्यात आलीय. लवकरच ती २४ तास सुरू करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
पोलीस आयुक्तालयातल्या हेल्पलाईनवर आजवर २०६ महिलांनी तक्रार केली तर आडगाव पोलीस ठाण्यात १०२ महिलांच्या तक्रारींची दखल घेण्यात आली. पण धक्कादायक बाब म्हणजे यातल्या बहुतेक तक्रारी या घरगुती हिंसाचाराच्या आहेत.
घराबाहेर महिला सुरक्षित नाहीत हे बलात्काराच्या वाढत्या आकडेवारीवारुन सिद्ध होतंय. पण आयुक्तालयाच्या हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारींची संख्या पाहता महिला घरातही असुरक्षित असल्याचं दिसतंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.