www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यातील कचरा कोंडीवर अजूनही ठोस तोडगा निघालेला नाही. मात्र, कचऱ्याच्या प्रश्नावरून आता राजकीय पक्षांची स्टंटबाजी सुरु झालीय..सगळेच पक्ष कचऱ्याच्या प्रश्नावर वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करत आहेत. दरम्यान, शरद पवार सध्या पुण्यात आहेत. आज संध्याकाळी त्यांनी त्यांनी अधिकारी आणि ग्रामस्थांची बैठक बोलावलीये.. सर्कीट हाऊसमध्ये पाच वाजता ही बैठक होतीये. गेली अनेक वर्षे प्रलंबीत असलेल्या या कचरा प्रश्नावर पवारांच्या मध्यस्थीनंतर तरी आता तोडगा निघणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.
मात्र शहरात साठलेल्या कचऱ्याची कशी विल्हेवाट लावणार यावर बोलायला कोणीच तयार नाही. दरम्यान पुण्यातील कचरा प्रश्नात आता केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी देखील लक्ष घातलंय...पुण्यात सध्या पेटलेल्या कच-याच्या प्रश्नावर आता स्वतः शरद पवार लक्ष घालणार आहेत. पुण्यातले राजकीय पक्ष कच-याच्या मुद्यावरुन अशाप्रकारे आंदोलनं करतायत... गुरुवारी भाजपनं थेट आयुक्तांच्या कार्यालयात कचरा आणून टाकला.
या आंदोलनानंतर शिवसेना आणि मनसे तरी कसे मागे राहतील.. शिवसेनेनं तर पालिकेची उल्टा-पुल्टा सभाच होऊ दिली नाही.. दरवर्षी या सभेत अधिकारी नगरसेवकांचा रोल निभवतात. तर, वर्षभर अधिकाऱ्यांना धारेवर धरणारे नगरसेवक अधिकारी बनतात.. मात्र शिवसेनेनं हीच सभा होऊच दिली नाही.. तर दुसरीकडे मनसेनं महापालिकेच्या इमारतीपुढे आंदोलन केलं.
कच-याच्या मुद्यावरुन सध्या पुण्यात राजकीय स्टंटबाजी सुरु असल्याचा आरोप होतोय.. सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीही त्यातलेच असल्याचा आरोप होतोय... कच-यावर ग्रामस्थांनी आंदोलन केलं की महापालिकेकडून विकास कामांसाठी निधी, गावातील तरुणांना नोकरी अशी आश्वासनं द्यायची आणि वेळ मारून न्यायची हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा खाक्या. मूळ कचऱ्याच्या प्रश्नवार मात्र सगळ्यांचेच दुर्लक्ष… परिणामी दर दोन चार महिन्यांनी पुण्यात असे कचऱ्याचे ढीग लागतात. त्यामुळं हा कचरा कोंडी कधी फुटणार असा सवाल उपस्थित होतोय..
महापालिकेतील अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थांशी शरद पवार त्यांच्या पुण्यातील निवास्थानी चर्चा केली. मात्र या चर्चेतूनही हा प्रश्न सुटला नाही. आता शनिवारी संध्याकाळी पुन्हा या सर्वांची बैठक होणार आहे… मात्र कचऱ्याच्या प्रश्नावरून सध्या सुरु असलेली आंदोलनं म्हणजे, कचऱ्यावर राजकीय पोळी भाजण्याचाच प्रकार म्हणावा लागेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.