पैसे खाणाऱ्या महिला पोलिसाची दबंगगिरी!

‘सद् रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद उराशी बाळगत पोलीस जनतेची सेवा करतात.. मात्र पिंपरीत एक महिला पोलीसानं खाकीला डाग लागावं असं वर्तन केलंय...

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 16, 2013, 11:33 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड
‘सद् रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद उराशी बाळगत पोलीस जनतेची सेवा करतात. मात्र पिंपरीत एक महिला पोलीसानं खाकीला डाग लागावं असं वर्तन केलंय.
निगडी पोलिस स्थानकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक रुपाली बोबडे. वास्तविक पाहता एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या महिलेन नागरिकांना दिलासा देण्याच काम कारण गरजेच आहे. मात्र रुपाली बोबडे यांना त्याचा विसर पडलाय की काय अस म्हणण्याची वेळ आलीय. नागरिक तक्रारी दाखल करण्यासाठी पोलिस स्थानकात आल्या नंतर रुपाली बोबडे या पैसे मागत असल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर होतोय... ब-याच ठिकाणी ज्यांच्या विरोधात तक्रार दाखल केलीय त्यांच्याकडून पैसे घेवून मांडवली केली जाते असा आरोप बोबडे यांच्यावर करण्यात आलाय. या संधर्भात थेट उपायुक्त शहाजी उमाप यांच्याकडं तक्रार दाखल करण्यात आलीय.

हे आरोप होत असताना रुपाली बोबडे मात्र काहीही बोलायला तयार नाहीत. याबाबत सहय्यक पोलिस उपायुक्त चौकशी करतील आणि त्यानंतर कारवाई केली जाईल अस उपायुक्तांनी सांगितलं. सर्वच पोलीस भ्रष्टाचार करतात असं नाही. मात्र बोबडे यांच्या बाबतीत होत असलेल्या आरोपांनी पोलिसांची प्रतिमा मलिन झालीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.