www.24taas.com, झी मीडिया, पुणे
भाजप माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी राज-उध्दव यांनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केली. बाळासाहेबांचीही तशी अतीव इच्छा होती. त्यामुळे मराठी माणसाच्या हितासाठी या दोघांनी एकत्र यावं असं ते म्हणाले.
दिल्लीच्या राजकारणात आपलं मन रमत नाही, अशी मनापासून कबुलीही त्यांनी दिली. गैरव्यवहाराच्या आरोपांमध्ये एक टक्का जरी दोषी आढळलो तरी राजकारण सोडेन, या शब्दात भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी विरोधकांना आव्हान दिलं आहे.
नितीन गडकरी यांनी त्यांच्या पूर्ती प्रकरणाबाबतही सांगितले. पूर्ती प्रकरणात शरद पवार आपल्या पाठीशी ठाम उभे राहिल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. पुण्यातल्या कार्यक्रमात `झी २४ तास`चे संपादक उदय निरगुडकर यांना दिलेल्या मनमोकळ्या मुलाखतीत ते बोलत होते.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.