www.24taas.com,कोल्हापूर
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना तातडीने हेलिकॉप्टरने पुण्याला हलविण्यात आले.
शरद पवार येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यांचा बीपी हाय झाल्याने त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला. पुण्यातील डॉक्टरांनी अन्य वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी त्यांना तातडीने पुण्याला बोलविले. त्यामुळे पवारांना कोल्हापुरातून पुण्याला हलविण्यात आले.
पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने आजचा नियोजीत कोल्हापूर आणि सांगली दौरा रद्द करण्यात आला आहे. कोल्हापुरात ते सरपंच महापरिषदेसाठी उपस्थित राहणार होते. आज दिवसभरात कोल्हापूर आणि सांगली इथे त्यांचा नियोजीत दौरा होता.
सकाळी ९.३० वाजता ते कोल्हापुरातील सरपंच महापरिषदेच्या उद्घाटनाला उपस्थित होते. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात उपस्थित राहणार होते.
या दरम्यान त्यांना कोल्हापुरातील विश्रातगृहात गेले असता अस्वस्थ वाटू लागल्याने डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटलच्या पथकाने तपासणी करुन त्यांना पुण्यात रवाना होण्यास सांगितले. उद्या ते म्हैसुर दौ-यावर ते जाणार होते.
पवारांच्या तब्बेचे वृत्त समजताच कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमनाचे वातावरण होते. मात्र, काही काळजी करण्याचे कारण नाही, असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलेय. पवार आपल्या घरी विश्रांती घेत आहेत.