www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या हस्ते मोशीमध्ये उदघाटन केलेल्या उपबाजार समितीचं बांधकाम बेकायदा असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र हे आरोप फेटाळून लावलेत.
पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथल्या याच उप बाजार इमारतीचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन झालं. पण आता याच इमारतीवरुन वाद निर्माण झालाय. हा उपबाजार ज्या जागेवर उभा आहे, ती जागा नवनगर प्राधिकरणाची आहे आणि ती ताब्यात न घेताच जिल्हाधिकारी कार्यालयानं ती परस्परच बाजार समितीला दिल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. जिल्हाधिकारी कार्यालयानं घेतलेल्या या निर्णयाला सरकारची मंजुरी नसताना ही इमारत उभी राहिलीच कशी, असा सवाल शिवसेनेनं केलाय.
दुसरीकडे राष्ट्रवादीनं हे सगळे आरोप खोडून काढलेत. पुढचे काही दिवस हा मुद्दा बराच गाजणार, अशीच चिन्हं आहेत. शिवसेना खासदार गजानन बाबर यांनी यात उडी घेत आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.