www.24taas.com, झी मीडिया नवी दिल्ली
‘बिग बॉस ७’ सीजनमध्ये आता स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगली असताना त्यात भर टाकण्यासाठी गुरूवारी बिग बॉसच्या घरात ‘जनता की अदालत’ घेण्यासाठी रजत शर्मा यांनी एंट्री केली. त्यामुळे बिग बॉसमध्ये गुरुवारचा दिवस हा स्पर्धकांसाठी वेगळा दिवस राहिला.
गुरुवारी बिग बॉसच्या घरात शर्मा यांनी जनता की अदालत हा कार्यक्रम घेतला. रजत शर्मा यांनी प्रथम स्पर्धकांना प्रश्न विचारण्यात आले. उत्तर ऐकताना रजत शर्मांनी बिग बॉसच्या घरातील काही व्हिडिओ क्लिप्स देखील स्पर्धकांना दाखवल्या. ह्या व्हिडिओ क्लिप्स बघून स्पर्धकांनी गप्प राहणे पसंत केले. तरकाहींनी हसून वेळमारून नेली.
सोफियाप्रकरणी रजत शर्मांनी अरमान कोहलीला प्रश्न विचारला. मात्र, अरमानने त्यावर बोलण्यास नकार दिला. मात्र, अरमान म्हणाला, सोफिया विषयावर मी बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर एक पत्रकार परिषद घेणार आहे.
या अदालतमध्ये तनिषा मुखर्जीचे रजत शर्मां यांनी कान टोचले. तिला एक प्रश्न विचारला तू अरमान कोहलीच्यासमोर गरिबासारखी का वागतेस? त्याची खरडपट्टी का शांतपणे ऐकूण घेतेस. त्यावेळी तनिषाने यासर्व गोष्टींचा नकार दिला.
गौहर खान हिचा व्हिडिओ दाखवून रजत शर्मांनी तिला प्रश्न विचारला, तेव्हा ती गडबडून गेली. रजत शर्मा यांनी तिच्यावर आरोप केला की गौहर खूप बोलते आणि कोणाचही ऐकूण घेत नाही. यावर गौहर खानने हे आरोप मान्य केलेत आणि म्हणाली की या जगात कोणीही परफेक्ट नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.