टीम इंडियासाठी १५३ ठरला लकी नंबर!

'टीम इंडिया'साठी १५३ हा लकी नंबर ठरतोय, असं दिसतंय... कारण, सचिन, सेहवाग आणि रोहीत शर्मानं ज्या ज्या वेळेस विश्वविक्रम नोंदवलेत.... त्यावेळेस टीम इंडियाला विजय मिळालाय... आणि तोही प्रत्येक मॅचमध्ये १५३ रन्सनं... 

Updated: Nov 14, 2014, 04:20 PM IST
टीम इंडियासाठी १५३ ठरला लकी नंबर! title=

मुंबई : 'टीम इंडिया'साठी १५३ हा लकी नंबर ठरतोय, असं दिसतंय... कारण, सचिन, सेहवाग आणि रोहीत शर्मानं ज्या ज्या वेळेस विश्वविक्रम नोंदवलेत.... त्यावेळेस टीम इंडियाला विजय मिळालाय... आणि तोही प्रत्येक मॅचमध्ये १५३ रन्सनं... 

तुम्हाला आठवत असेल तर, सचिन तेंडुलकरने द्विशतक ठोकून जेव्हा विश्वविक्रम नोंदवला त्यावेळी त्यावेळेस भारतीय क्रिकेट संघाला १५३ धावांनी जिंकला होता.

त्यानंतर, सचिनचा रेकॉर्ड तोडत सेहवागनं २१९ रन्स ठोकले त्याही वेळेस टीम इंडियाला १५३ धावांनी विजय मिळाला होता.

तर, गुरुवारी झालेल्या श्रीलंका विरुद्ध भारत सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड करत रोहित शर्मानं २६४ रन्स ठोकले... रोहितनं नवा विश्वविक्रम नोंदवला... आणि योगायोग म्हणजे कालही टीम इंडिया पुन्हा एकदा १५३ रन्सनं विजयी झाली.

हे तीनही विश्वविक्रम आणि भारतीय संघाला मिळालेला १५३ रन्सनं विजय, असं काही समीकरण तर नाही ना, अशी शंका यावी, इतपत हे आकडे जुळतायत... याला योगायोग समजा की आणखी काही? परंतु १५३ हा आकडा आपल्या भारतीय क्रिकेट संघासाठी लकी ठरला, हे मात्र खरं.. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.