ब्राझील : जर्मनीची फिफा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारली. पहिल्या सेमी फायनलमध्ये 7-1 ने ब्राझीलचा धुव्वा उडवत फुटबॉलच्या इतिहासात यजमानांची मानहानीकारक त्यांची एक्झिट केली.
ब्राझीलनं फुटबॉलच्या इतिहासातील काळा दिवस पाहिला तो जर्मनीविरुद्धच्या वर्ल्ड कप सेमी फायनल मॅचमध्ये. जर्मनीनं ब्राझीलचा 7-1 नं धुव्वा उडवत दिमाखात वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. यजमान ब्राझिलचा हा वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला. या आधी 1998 मध्ये सांबा टीमला फ्रान्सकडून 3-0 नं मात खावी लागली होती.
पाच वेळा वर्ल्डकप जिंकलेल्या ब्राझील विरुद्ध मैदानात उतरलेल्या जर्मन संघाचे पारडे जड वाटत होते. सामान्याच्या अकराव्या मिनिटापासून जर्मनीने निर्माण केलेला दबदबा कायम ठेवत ७-१च्या मोठ्या फरकाने सामाना जिंकला.
जर्मनीचा स्टायकर थॉमस मुलरने ११ व्या मिनिटाला कॉर्नर किकवर गोल मारत जर्मनीच्या खात्यात पहिला गोल नोंदविला. त्यानंतर जर्मनीने सामन्यावर पकड घट्ट करत एकामागून एक गोल केले.
पहिल्या हाफपर्यंत ५-० असणा-या सामन्याच्या स्कोअरकार्डमध्ये जर्मनीने पुढील ४५ मिनिटांमध्ये आणखीन दोन गोलची भर टाकत स्कोरकार्ड ७ वर नेऊन ठेवले. ब्राझीलकडून ऑस्करने ९०व्या मिनिटाला गोल केला. तोच एकमेव गोल ठरला.
ब्राझिलला पराभूत केल्यानंर आता जर्मनीचा फायनलमध्ये मुकाबला अर्जेन्टीना आणि नेदरलँड्स यांच्यातील विजेत्या टीमशी होईल. तर आज फुटबॉलप्रेमींना अर्जेन्टीना आणि नेदरलँड्सच्या सेमी फायनलच्या मॅचची मेजवानी मिळणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.