मुंबई : अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूरने कठीम परिस्थितीत नवव्या विकेटसाठी ३७ चेंडूत ५० धावांची अतूट भागिदारी करून पश्चिम क्षेत्राने आज दक्षिण क्षेत्रावर दोन विकेटने रोमांचक विजय मिळविला. या विजयामुळे देवधर ट्रॉफीच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत पश्चिम विभागाने फायनलमध्ये धडक मारली.
पश्चिम विभागासमोर ३१५ धावांचे अवघड लक्ष्य ठेवले होते. त्यांनी २६९ धावांवर आठ विकेट गमावल्या. विश्व चषक स्पर्धेत जागा बनविण्याचा प्रबळ दावेदार अक्षर एका बाजूला टिकून राहिला आणि नंतर आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवली. अक्षरने ३८ चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांसह ६४ धावा बनविल्यात तर शार्दुल ठाकूर याने २३ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांसह ३१ धावा काढल्या. या दोघांनी सुर्यकुमार यादव (८०) अंबाती रायुडू (५४) आणि शेल्डन जॅकसन (५१) यांच्या अर्धशतकीय खेळी वाया जाऊ दिल्या नाहीत.
पश्चिम विभागाने ४७.१ षटकात आठ विकेटवर ३१९ बनवून फायनलमध्ये जागा बनवली. फायनल सामना तीन डिसेंबरला पूर्व विभागाशी होणार आहे. यापूर्वी दक्षिण विभागाने प्रथम फलंदाजी करून ३१४ धावांचा कुटल्या. यात मयांक अग्रवालने ८६, बाबा अपराजित ५६, मनीष पांडे ५५, रॉबिन उथप्पा ४७ आणि करूण नायर यांने ३५ धावांचे योगदान दिले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.