मुंबई : कांस्यपदक विजेती बॉक्सर मेरी कोम निवड समितीसमोर ढसाढसा रडली. ज्यावेळी ऑलिंपिक पदक जिंकल्यानंतर भारतात परतलेली मेरी कोम अत्यंत भाऊक झाल्याचे आपण पाहिले होते. सर्वांनी तिचे स्वागत केले आणि हे प्रेम पाहून ती भारावली होती. मात्र, त्याच मेरी कोमला निवड समितीसमोर रडावे लागले.
मेरी कोमने निवड समितीवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. निवड समितीमुळे मला अनेकवेळा मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. काही सामनाधिकारी आणि जज माझी बाजू ऐकून घेत नाहीत. मला त्यांच्या वागण्याची फिकीर नाही. मी ईशान्येकडील आहे ही समस्या नाही. मी एक भारतीय आहे. निवड समिती हरियाणाची पिंकी जांगडा हीला झुकते माप देत आहे. मात्र, मणिपूरच्या बॉक्सरने पाचवेळा हरविले आहे. तसेच पिंकीला मी नेहमी हरवत आले आहे. तिला हरवून मी सुवर्ण पदकही जिंकले आहे. मात्र, निवड समिती तिचीच बाजू घेत आहेत.
लंडन ऑलंपिकमध्ये पदक जिंकूनही २०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी मेरी कोमला निवडले गेले नाही. मात्र, माझ्या ऐवजी पिंकी जांगडा हिला निवडले गेले, हे कसे काय शक्य झाले. दरम्यान, ५१ किलो वजनी गटात सराव सामन्यात मेरी कोमला पिंकीने हरविले होते. मात्र, मेरी कोमला हरविण्यासाठी चुकीचा निर्णय घेतला गेला, असा आरोप अन्य बॉक्सर खेळाडूंनी केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.