मीरपूर: आशिया कप टी-20 मध्ये भारतानं पाकिस्तानचा दारुण पराभव केला आहे. या विजयामुळे भारतीय टीम आणि फॅन्स चांगलेच खुश झालेत. पण या मॅचनंतर धोनी मात्र थोडा नाराज झाला आहे.
मॅचच्या वेळी अंपायरनी लावलेले हेडफोन आणि इतर उपकरणांवर धोनीनं नाराजी व्यक्त केली आहे. अंपायर आता वॉकी टॉकी ऐवजी हेडफोन वापरतात, या हेडफोनमधून ते एका कानानं ऐकत असतात. प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये बॅटला लागून गेलेल्या बॉलचा आवाज या उपकरणांमुळे येत नाही, असं धोनी म्हणाला आहे.
पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये आशिष नेहराच्या बॉलिंगवर खुर्रम मंजुरच्या बॅटला बॉल लागून धोनीनं कॅच पकडला, पण बांग्लादेशचे अंपायर एसआयएस सैकत यांनी मंजुरला नॉट आऊट ठरवलं, त्यामुळे धोनीची मैदानातील नाराजी कैमेरानं टिपली होती.
अंपायरिंगच्या याच मुद्द्यावरून धोनीला पत्रकार परिषदेमध्येही विचारलं, तेव्हा तुमचा टी-20 वर्ल्ड कपआधी माझ्यावर बंदी घालायचा विचार आहे का असा टोला धोनीनं हाणला.