गाले : आशियातील क्रिकेट पिचवर फिरकी गोलंदाजांचा बोलबाला असतो, पण दक्षिण आफ्रिकेचा जलद गती गोलंदाज डेल स्टेन एक अनोखा रेकॉर्ड केला आहे. स्टेन एशियामध्ये सर्वाधिक विकेट घेणारा परदेशी गोलंदाज ठरला आहे. स्टेनच्या नावावर १६ सामन्यात ८० विकेट घेतल्या आहेत.
स्टेनने हा कारनामा गालेमध्ये श्रीलंका विरुद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या टेस्टच्या शेवटच्या दिवशी करून दाखविला आहे. या स्टेटमध्ये त्याने एकूण ९ विकेट घेतल्या. स्टेनने माजी कॅरेबियन गोलंदाज कर्टनी वॉल्श याचा रेकॉर्ड तोडला आहे. वॉल्श यांनी १७ टेस्टमध्ये ७७ विकेट घेतले होते.
तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ग्लेन मेकग्राथ हा आहे. त्याने आशिया मैदानावर ७२ विकेट घेतल्या आहेत. वेस्ट इंडिजच्या माल्कम मार्शलने ७१ विकेट, न्यूजीलंडच्या सर रिचर्ड हॅडली ६८ विकेट आणि शॉन पोलॉक ६० विकेट घेऊन सहाव्या स्थानावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज जेसन गिलेस्पी यांने ५४ विकेट घेतल्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.