सिडनी: भारताची शटलर क्वीन सायना नेहवालने ऑस्ट्रेलिया सुपर सीरिजच्या विजेतेपदाला गवसणी घातलीय. सायनानं स्पेनच्या कॅरोलिना मरिनला 21-18, 21-11नं पराभूत करत विजेतेपद पटकावलं.
2012 नंतर तिचं हे पहिलंच सुपर सीरिजमधील विजेतेपद ठरलंय. गेल्या कित्येक दिवसांपासून सायना फॉर्मसाठी धडपडत होती. अखेर सायनाला सूर गवसला आणि तिने विजतेपदाला गवसणी घालली. इंडिया ओपन ग्रांप्री गोल्ड स्पर्धा जिंकल्यानंतर यंदाच्या मोसमातील सायनाचं हे दुसरं टायटल ठरलंय. या विजयाबरोबर सायनाने ७ लाख ५० हजार डॉलर्स एवढं घसघशीत बक्षिसही मिळवलं आहे.
तत्पूर्वी उपांत्य फेरीत अव्वल मानांकित शिक्झियन वांगला पराभूत करणाऱ्या सायनानं अंतिम सामन्यातही बहारदार खेळी करत स्पेनच्या कॅरोलिना मरिनचा धुव्वा उडवला. जागतिक क्रमवारीत अकराव्या स्थानावर असणाऱ्या कॅरोलिनाचा सायनानं २१-१८, २१-११ अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. याआधी गेल्या वर्षीच्या इंडोनेशिया ओपनमध्ये या दोघांची गाठ पडली होती. तेव्हाही सायानानंच बाजी मारली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.