मुंबई : 2008 च्या आयपीएलमध्ये हरभजन सिंगनं श्रीसंतच्या कानाखाली मारली होती. या वादाबाबत आता हरभजन सिंग बोलला आहे. त्यानं नौटंकी केल्यामुळे मी त्याला मारलं. माझ्या आयुष्यातली ती मोठी चूक होती असं हरभजन म्हणाला आहे.
त्या संपूर्ण प्रकरणामध्ये मी दोषी होतो, आणि आजही मला त्या प्रकाराची लाज वाटते, अशी प्रतिक्रिया हरभजननं दिली आहे. श्रीसंतचं ते रडणं पाहून सगळ्यांना वाटलं असेल मी त्याला जोरात मारलं, असा टोमणाही त्यानं लगावला आहे. एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये हरभजननं हे वक्तव्य केलं आहे, तसंच या कार्यक्रमात पुन्हा एकदा हरभजननं या प्रकाराबद्दल माफीही मागितली आहे.