सिडनी : क्रिकेट वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलचा थरार आजपासून सुरू झालाय. हॉट फेव्हरिट दक्षिण आफ्रिका आणि डार्क हॉर्सच्या रेसमध्येही नसलेली श्रीलंका यांच्यात पहिली क्वार्टर फायनल सिडनीमध्ये सुरू झाली आहे.
श्रीलंकेनं टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चोकर्स दक्षिण आफ्रिका आणि वर्ल्ड कपमध्ये नॉक आऊट पंचसाठी प्रसिद्ध असलेली लंका यांच्यात कोण बाजी मारणार, हे आज ठरेल. कुमार संगकारा विरुद्ध एबी डिव्हिलियर्स असा अनोखा मुकाबला क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळेल.
संगकारानं १२४ च्या सरासरीनं४९६ रन्स करत सर्वाधिक रन्स केलेत. तर डिव्हिलियर्सनं ८३.४० च्या सरासरीनं ४१७रन्स केले आहेत.इम्रान ताहिर-रंगना हेराथ हे स्पिनर्स आणि डेल स्टेन-लसिथ मलिंगा या सिमर्सकडेही चाहत्यांचं लक्ष असेल... हेराथची दुखापत ही लंकेसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.