टीम इंडियाचे बॅट्समन आणि बॉलर्स सीरिजमध्ये फेल

पाचव्या आणि शेवटच्या ओव्हल टेस्टमध्ये टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झालाय. एक डाव आणि 244 रन्सनं कॅप्टन कुकच्या इंग्लंड टीमकडून भारतीय टीमचा मानहानीकारक पराभव झालाय.

Updated: Aug 17, 2014, 09:51 PM IST
टीम इंडियाचे बॅट्समन आणि बॉलर्स सीरिजमध्ये फेल  title=

लंडन: पाचव्या आणि शेवटच्या ओव्हल टेस्टमध्ये टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झालाय. एक डाव आणि 244 रन्सनं कॅप्टन कुकच्या इंग्लंड टीमकडून भारतीय टीमचा मानहानीकारक पराभव झालाय.

दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना टीम इंडियाचे बॅट्समन तिसऱ्या दिवशी शंभरीही गाठू शकले नाहीत. टीम इंडिया अवघ्या 94 रन्समध्ये गारद झालीय. या पराभवामुळं टीम इंडियानं पाच मॅचची ही सीरिज 3-1 नं गमावलीय. 

टीम इंडियाचे बॅट्समन आणि बॉलर्स या सीरिजमध्ये फेल झालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.