मुंबई : आयपीएलच्या ९ व्या सीजनची सनरायजर्स हैदराबाद चॅम्पियन ठरली. हैदराबादने बंगळुरुवर ८ रन्सने विजय मिळवला. रविवारी झालेल्या या सामन्यानंतर खेळाडूंवर पैशांचा वर्षाव झाला.
आयपीएलच्या ९ व्या सीजनची चॅम्पियन हैदराबादला विजयानंतर १५ कोटीं रुपयांचं बक्षिस मिळालं. तर उपविजेते बंगळुरुला १० कोटी रुपये मिळाले.
सुरेश रैनाच्या नेतृत्वाखालील गुजरात लायन्स हा संघ तिसऱ्या स्थानी राहिला. या संघाला ७.५ कोटींचे बक्षिस देण्यात आले. चौथ्या स्थानी राहिलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला ७.५ कोटींचे बक्षिस देण्यात आले.
ऑरेंज कॅप - आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या विराटला ऑरेंज कॅप देण्यात आली. विराटला १० लाख रुपयांचे बक्षिस देण्यात आले.
पर्पल कॅप - हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारने पर्पल कॅपचा मान मिळवला. त्यालाही १० लाखांचे बक्षिस देण्यात आले.
मॅन ऑफ द मॅच - अंतिम सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या बेन कटिंगला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याला ५ लाखांचे बक्षिस देण्यात आले.
बेस्ट फिल्डर - यंदाचा बेस्ट फिल्डरचा अॅवार्ड हा एबी डिविलियर्सला देण्यात आला. एबीने या सीजनमध्ये १९ कॅच घेतले त्याला १० लाखांचे बक्षिस देण्यात आले.
सर्वाधिक सिक्स - यंदाच्या सीजनमध्ये विराट कोहलीने सर्वाधिक ३८ सिक्स लगावले. त्याला यासाठी १० लाखांचं बक्षिस देण्यात आलं.
फास्टेस ५० - क्रिस मॉरिसने १७ बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं होतं त्यामुळे त्याला फास्टेस ५० साठी १० लाखांचं बक्षिस देण्यात आलं.
सुपर कॅच - यंदाचा सुपर कॅच अॅवार्ड सुरेश रैनाला देण्यात आला त्याला यासाठी १० लाखांचं बक्षिस देण्यात आलं.
ग्लेन शॉट - यंदाचा ग्लेन शॉट अॅवार्ड डेविड वॉर्नरला मिळाला त्याला यासाठी १० लाखांचं बक्षिस देण्यात आलं.
फायनलमध्ये सर्वाधिक सिक्स - फायनल मॅचमध्ये गेलने सर्वाधिक ८ सिक्स लगावले. त्याला यासाठी १ लाखांचं बक्षिस मिळालं.
मोस्ट वॅल्युएबल प्लेयर - विराट कोहली ३५६.५ गुणांसह यंदाचा सर्वाधिक महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे यासाठी त्याला १० लाखांचं बक्षिस देण्यात आलं.
इमर्जिंग स्टार - मुस्तफिजूर रहमान यंदाचा इमर्जिंग स्टार ठरला आहे त्याला १० लाखांचं बक्षिस देण्यात आलं.
फेअर प्ले अॅवार्ड - सनरायजर्स हैदराबादला आयपीएल २०१६ चा फेअर प्ले अॅवार्ड देण्यात आला.