मुंबई : ऑलिम्पिकनंतर खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव करण्याऐवजी ऑलिम्पिकला जाण्याआधी अधिक हातभार मिळायला हवा होता असं मत भारतीय ऍथलिट आणि माण कन्या ललिता बाबर हिनं व्यक्त केलंय.
ऑलिम्पिकला जाण्याआधी भारतीय खेळाडूंना मदत दिली असती तर ती अधिक मनौधैर्य वाढवणारी ठरली असती असं तिनं म्हटलंय.
ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणा-या पी.व्ही. सिंधू आणि साक्षी मलिक तसंच दीपा कर्माकर, ललिता बाबर यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव होतोय.. विविध राज्यांकडून या ऑलिम्पिकवीरांना कोट्यवधींच्या रकमा जाहीर करण्यात येतायत.
यापैकी पी.व्ही.सिंधूला 13 कोटी रुपये, साक्षी मलिकला साडेपाच कोटी, ललिता बाबरला 15 लाख तर दीपा कर्माकरला 15 लाखांची बक्षिसं जाहीर झालीत. मात्र ऑलिम्पिकच्या तयारीसाठी मिळालेली रक्कम आता जाहीर होणा-या बक्षिसाच्या तुलनेत कितीतरी पटीने कमी आहे. त्यामुळं बक्षिसं जाहीर करणारी राज्य, देशातील क्रीडा संघटना यांना किमान आता तरी जाग येईल का असा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय.