मुंबई: ९९ वर्षांनी चिलीनं कोपा अमेरिकाला गवसणी घातली. तर २२ वर्षांपासून कोपा अमेरिका जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अर्जेन्टाईन टीमचं स्वप्न अपूर्णच राहिलं. पेनल्टी शूट आऊटमध्ये चिलीनं ४-१ नं बाजी मारत पहिल्या-वहिल्या कोपा अमेरिका टायटलवर आपलं नाव कोरलं.
जवळपास १०० वर्षांपासून चिलीची टीम कोपा अमेरिका जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगून होती आणि जेव्हा आपलं इतक्या वर्षांचं स्वप्न सत्यात उतरतं तेव्हा त्या विजयाचा आनंद काही औरच असतो ते चिलीच्या टीमच्या विजयी सेलिब्रेशनमध्ये दिसून आलं.
कोपा अमेरिका कपच्या फायनलमध्ये बलाढ्य अर्जेन्टिनीशी त्यांना दोन हात करायचे होते. इतिहासही अर्जेन्टाईनच्या टीमच्या बाजूनं होता. त्यात लिओनेल मेसीसारखा तगडा प्लेअर प्रतिस्पर्धी टीममध्ये असल्यानं समोरच्या टीमचं खच्चीकरण करण्यासाठी हे नावचं पुरेसं होतं. मात्र, चिलीची टीम घरच्या प्रेक्षकांसमोर खेळत होती. आणि त्याचं मनोबल यामुळेच वाढलं होतं.
मोक्याच्या क्षणी ही टीम खचली नाही. ९० मिनिटांच्या निर्धारित वेळेत दोन्ही टीम्सना गोल करण्यात सपशेल अपयश आलं. अखेर ही मॅच पेनल्टी शूट आऊटमध्ये गेली. पेनल्टी शूटआऊटमध्ये गेलेल्या या मॅचमध्ये अर्जेन्टिनाकडून मेसी वगळता त्यांच्या एकाही फुटबॉलर गोल गोलपोस्टमध्ये धाडता आला नाही आणि चिलीचं पहिल्यांदा कोपा अमेरिका जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं.
तर अर्जेन्टानाला या टुर्नामेंटच्या विजेतेपदानं पुन्हा एकदा हुलकावणी दिली. दोन्ही टीम्सपैकी कोणीही अजिंक्यपद पटकावलं असत तरी, ऐतिहासिक कामगि्रीची नोंद झाली असती आणि इतिहास लिहीला तो चिलीच्या टीमनं. त्यामुळंच अर्जेन्टिनासाठी चिली टू हॉट ठरली असचं म्हणावं लागेल.
दरम्यान, चिली फॅन्सनी मॅच पाहायला आलेल्या मेसीच्या कुटुंबियावर हल्ला केल्याची घटना घडली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.