मुंबई : भारताचा वन डे आणि टी-२० कर्णधार महेंद्रसिंह धोनी आता आयपीएलमधील संघ विकत घेण्यास इच्छूक आहे. चेन्नई सुपर किंग्जवर निलंबनाची कारवाई झाल्यावर धोनीने आता थेट संघमालक होण्याची तयारी सुरू केली आहे.
चेन्नई सुपर किंग्जमध्ये गेल्या ८ वर्षापासून खेळणाऱ्या धोनी संघावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर कोणाकडून खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. पण आता या नव्या बातमीने सर्वांचा भुवया उंचावल्या आहे.
आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलमधून बाद करण्यात आले आहे. आता आयपीएलमध्ये दोन नवीन संघ येणार असून यासाठी नऊ शहरांचा पर्याय बीसीसीआयने दिला आहे.
यात अहमदाबाद, कानपूर, इंदौर या शहरांचा समावेश आहे. एका संघासाठी ४० कोटी रुपये बेस प्राईज ठेवण्यात आली आहे. महेंद्रसिंह धोनीने नवीन संघ विकत घेण्यास इच्छूक असल्याचे बीसीसीआयला कऴवल्याचे वृत्त आहे. धोनीशिवाय कोलकाता येथील उद्योजक संजीव गोएंका यांनीदेखील संघ विकत घेण्याची तयारी दर्शवली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.