मुंबई: टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये दारूण पराभव झालाय. ऑस्ट्रेलियानं ९५ रन्सनं भारताचा पराभव करून फायनलमध्ये धडक मारली.
टीम इंडियाचा असा पराभव का झाला... जाणून घ्या पराभवाची ८ मोठी कारणं...
१. टॉस हरणं- जशी खेळाची सुरूवात झाली. एकानंतर एक प्रत्येक वेळी निराशा हाती लागली. सर्वात आधी कॅप्टन धोनी टॉस हरला आणि यासोबतच ऑस्ट्रेलियानं भारताला पहिले बॉलिंग करण्याची संधी दिली आणि ऑस्ट्रेलियानं विशाल स्कोअर उभा केला.
२. विराटनं कॅच सोडली - जेव्हा टीम इंडिया विकेटच्या शोधात होती. तेव्हा विराट कोहलीनं हॅडिनची कॅच सोडली.
३. मोहम्मद शामी अपयशी - भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शामी एकही विकेट घेऊ शकला नाही.
४. अखेरच्या ओव्हर्समध्ये जॉनसनची खेळी - ऑस्ट्रेलियाची सुरूवात चांगली झाली. मात्र मिडल ऑर्डर बॅट्समनना भारतीय बॉलर्सनं आऊट केल्यानंतर अखेरच्या ओव्हर्समध्ये जॉनसननं धमाकेदार खेळी केली आणि ऑस्ट्रेलियाला विशाल स्कोअर उभा करण्यात मदत केली. जॉनसननं ९ बॉल्समध्ये २७ रन्स केले.
५. मोठ्या स्कोअरचा भारतावर दबाव - भारतीय टीम मोठ्या स्कोअरच्या दबावातून बाहेर पडू शकली नाही. मात्र शिखर धवनच्या आऊट झाल्यानंतर भारताच्या विकेट्सची पडझड झाली.
६. कोहली फ्लॉप - भारताचा स्टार बॅट्समन विराट कोहलीकडून टीम इंडियाला खूप आशा होत्या. मात्र तो अवघ्या १ रन्सवर आऊट झाला. जेव्हा की, त्यावेळी टीमला रन्स पेक्षा तो टिकणं जास्त गरजेचं होतं.
७. लोअर ऑर्डरही धडपडली - भारतीय टीमची लोअर ऑर्डर अयशस्वी ठरली. अखेरच्या पाच विकेट्स अवघ्या काही रन्सवर आटोपल्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.