नवी दिल्ली : मॅक्सिकोमध्ये एका फुटबॉल मॅचमध्ये काही असं घडलं की तेथे उपस्थित लोकांना धक्का बसला. फुटबॉल मॅचदरम्यान एका खेळाडूने रेफ्रीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
रेफ्रीने या खेळाडूला दूसरऱ्या टीमच्या खेळाडूला धक्का दिल्याने रेड कार्ड दाखवलं. त्यामुळे रागात आलेल्या खेळाडूने चक्क रागात रेफ्रीची हत्याच करुन टाकली.
रुबेन रिवेरा नावाच्या या फुटबॉलरने मॅचदरम्यान डोक्याने टक्कर मारली. रेफ्री तेथेच कोसळला. रुबेनच्या टीमने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण तो काही थांबला नाही. लाईव्ह मॅचदरम्यान हा धक्कादायक प्रकार लोकांनी पाहिला. या घटनेनंतर मॅच रोखण्यात आली. खेळाडूला मैदानातून बाहेर नेण्यात आलं. लोकांना वाटलं की रेफ्री बेशुद्ध झाला. पण नंतर कळालं की रेफ्रीचा मृत्यू झाला आहे.
रुबेन हा सध्या फरार झाला आहे. मॅक्सिको पोलीस त्याचा शोध घेत आहे. पण अशाप्रकारच्या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.