धोनीच्या फॅनने भर मैदानात पकडले त्याचे पाय... पाहा व्हिडिओ..

 मुंबईच्या सीसीआय स्टेडिअममध्ये आज वेगळचं दृश्य प्रेक्षकांना पाहायला मिळाले.   धोनी फलंदाजीसाठी आला असताना त्याचा एक फॅन अचानक मैदानात घुसला आणि त्याने सुरक्षेला भेदून धोनीला गाठले आणि त्याचे पायच धरले. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 10, 2017, 06:17 PM IST
 धोनीच्या फॅनने भर मैदानात पकडले त्याचे पाय... पाहा व्हिडिओ.. title=

मुंबई :  मुंबईच्या सीसीआय स्टेडिअममध्ये आज वेगळचं दृश्य प्रेक्षकांना पाहायला मिळाले.   धोनी फलंदाजीसाठी आला असताना त्याचा एक फॅन अचानक मैदानात घुसला आणि त्याने सुरक्षेला भेदून धोनीला गाठले आणि त्याचे पायच धरले. 

धोनीचा हा फॅन अचानक मैदानात घुसल्याने सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडाली. फॅन पिचपर्यंत धावत गेला आणि धोनीजवळ गेला धोनी त्याच्याशी शेकहँड करायचा प्रयत्न करत होता. पण त्याने सरळ धोनीचे पाय धरले. पण धोनीचा चांगुलपणा इतका की त्याने त्या पाया पडणाऱ्या फॅनला उठायला सांगितले आणि त्याच्याशी हात मिळविला. 

थोड्या वेळात सुरक्षा रक्षक आले आणि फॅनला ताब्यात घेऊन मैदानाबाहेर गेले. 

धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यावर अनेक चाहत्यांना धक्का बसला, पण हा चाहता वेगळा निघाला आणि त्याने थेट धोनीपर्यंत धाव घेतली आणि आपल्या निषेध एका वेगळ्या पद्धतीने नोंदविला.