ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया जाहीर, पहिली टेस्ट धोनी विनाच!

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टेस्ट सीरिजसाठी आज टीम इंडियाची निवड करण्यात आली असून महेंद्रसिंह धोनीला दुखापतीनं ग्रासल्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचला धोनीला विश्रांती देण्यात आली आहे. या सामन्यात विराट कोहली भारतीय टीमचं नेतृत्व करणार असून सुरेश रैनानं तब्बल दोन वर्षांनी भारताच्या टेस्ट टीममध्ये पुनरागमन केलं आहे. तर के. एल. राहुल आणि कर्ण सर्मा या नवीन चेहऱ्यांना ऑस्ट्रेलियाचे तिकीट मिळालं आहे. 

Updated: Nov 10, 2014, 04:35 PM IST
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया जाहीर, पहिली टेस्ट धोनी विनाच! title=

मुंबई: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टेस्ट सीरिजसाठी आज टीम इंडियाची निवड करण्यात आली असून महेंद्रसिंह धोनीला दुखापतीनं ग्रासल्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचला धोनीला विश्रांती देण्यात आली आहे. या सामन्यात विराट कोहली भारतीय टीमचं नेतृत्व करणार असून सुरेश रैनानं तब्बल दोन वर्षांनी भारताच्या टेस्ट टीममध्ये पुनरागमन केलं आहे. तर के. एल. राहुल आणि कर्ण सर्मा या नवीन चेहऱ्यांना ऑस्ट्रेलियाचे तिकीट मिळालं आहे. 

भारतीय संघ डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून आगामी वर्ल्डकपच्या पार्श्वभूमिवर भारतीय संघासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा समजला जात आहे. या दौऱ्यात टीम इंडिया चार टेस्ट मॅच खेळणार आहे. तसंच भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड अशी तिंरगी मालिकाही रंगणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची सोमवारी निवड करण्यात आली आहे.  

दुखापतीतून सावरलेल्या रोहित शर्मालाही भारतीय संघात स्थान मिळालं आहे. तर स्टुअर्ट बिन्नीला भारतीय संघातून डच्चू मिळालाय. महेंद्रसिंह धोनी पहिली टेस्ट मॅच वगळता उर्वरित दौऱ्यासाठी उपलब्ध होऊ शकेल असा अंदाज आहे. तर श्रीलंकेविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये शिखर धवनला विश्रांती देण्यात आली असून त्याऐवजी रोहित शर्माचा समावेश करण्यात आला आहे. 

टीम इंडिया टेस्ट टीम – 

महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), विराट कोहली, शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सुरेश रैना, रिद्धीमन शहा, नमन ओझा (विकेटकिपर), आर. अश्विन, कर्ण शर्मा, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, वरुण अॅशरोन

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.