इतिहासात एका इंनिगमध्ये पहिल्यांदाच लागले २ शकत

आयपीएलमध्ये गुजरातने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला तर बंगळुरुला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. करो या मरोची स्थिती असणाऱ्या बंगळुरुने पहिला झटका लवकर लागल्यानंतर मोठी खेळी केली.

Updated: May 14, 2016, 06:23 PM IST
इतिहासात एका इंनिगमध्ये पहिल्यांदाच लागले २ शकत title=

मुंबई : आयपीएलमध्ये गुजरातने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला तर बंगळुरुला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. करो या मरोची स्थिती असणाऱ्या बंगळुरुने पहिला झटका लवकर लागल्यानंतर मोठी खेळी केली.

गेल पुन्हा एकदा फेल ठरल्यानंतर कर्णधार कोहली आणि डिविलियर्सने डाव सांभाळला आणि जबरदस्त इनिंग खेळली. कोहली आणि डिविलियर्स या दोघांनी शतक ठोकत गुजरातच्या बॉलर्सला चांगलंच धुतलं.

कोहलीने ५५ बॉलमध्ये १०९ रन्सची तर डिविलियर्सने ५२ बॉलमध्ये १२९ रन्सची झंझावत खेळी केली आणि २४९ रन्सचं टार्गेट उभं केलं. प्रथमच एका टीममधील २ जणांनी शतक लगावल्याने नवा रेकॉर्ड प्रस्थापित झाला आहे. कोहलीने आयपीएलच्या या सीझनमध्ये ३ शतक ठोकत आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावी केला आहे.