'कॅप्टन' रोहित शर्मा बहरतोय - सचिन तेंडुलकर

महान क्रिकेटर आणि मुंबई इंडियन्सचा आयकॉन सचिन तेंडुलकरनं आयपीएल चॅम्पियन टीमचा कर्णधार रोहित शर्माची तोंडभरून स्तुती केलीय. गेल्या काही वर्षांत रोहित कॅप्टन म्हणून बहरलाय, असं सचिननं म्हटलंय. 

Updated: May 26, 2015, 05:40 PM IST
'कॅप्टन' रोहित शर्मा बहरतोय - सचिन तेंडुलकर  title=

कोलकाता : महान क्रिकेटर आणि मुंबई इंडियन्सचा आयकॉन सचिन तेंडुलकरनं आयपीएल चॅम्पियन टीमचा कर्णधार रोहित शर्माची तोंडभरून स्तुती केलीय. गेल्या काही वर्षांत रोहित कॅप्टन म्हणून बहरलाय, असं सचिननं म्हटलंय. 

रोहीतनं जेव्हा पहिल्यांदा कॅप्टन्सी सांभाळली होती, त्याच्या तुलनेत आजचा रोहीत खूपच बहरलाय... आज तो आत्मविश्वासानं भरलेला आहे. मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनच्या रुपात तो खूप चढ-उतारांमधून गोलाय. कारण यामुळे त्याला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागलाय. याच आव्हानांमुळे तो उत्तम क्रिकेटर आणि मजबूत व्यक्ती बनू शकतो. 

रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं चेन्नई सुपरकिंग्जला पछाडत दुसऱ्यांदा आयपीएलचा खिताब पटकावलाय. रोहितनं या सत्रात चांगल्या पद्धतीनं अनेक गोष्टींना अंमलात आणलं. आम्ही बैठका आणि ड्रेसिंग रुममध्ये ज्या रणनीति बनवल्या त्या चांगल्या पद्धतीनं मैदानावर लागू करण्यात तो यशस्वी झाला. बॉलर्स तुम्हाला जे फिडबॅक देतात त्यावर तुम्हाला कॅप्टनबद्दल अनेक गोष्टी समजू शकतात. बॉलर्स ज्या रणनीतिवर खेळतात किंवा ज्या क्षेत्रात बॉल टाकतात त्या त्याला कॅप्टननं सांगितलेल्या असतात, असंही तेंडुलकरनं म्हटलंय. 

तेंडुलकरच्या म्हणण्यानुसार, मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नव्हती. खरं म्हणजे, सुरुवातच खूप कठिण झाली होती. पण, हीच परीक्षेची वेळ होती... आणि यावेळी टीमनं एकजुटता दाखवली. केवळ योगायोग म्हणून आम्हाला हा विजय मिळालेला नाही. आम्ही जी कठोर मेहनत घेतली त्याचं हे फळ आहे. 

आम्हाला सगळ्यांनाच हा विश्वास होता की आम्ही परिस्थिती बदलू शकतो. तुमची सुरुवात कशी झाली याला अर्थ नसतो... महत्त्वाचं हे आहे की तुम्ही त्याचा शेवट कसा केला. लागोपाठ मॅच गमावल्यानंतरही आम्ही विश्वास गमावला नव्हता. आम्हाला आमच्या क्षमतेवर भरवसा होता. कोणत्याही कठिण समयी कोणताही खेळाडू निराश होताना दिसला नाही. आम्हाला नेहमीच आशेचा किरण दिसत होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.