ढाका : वर्ल्ड कपच्या अगोदर बांग्लादेश क्रिकेटला एक मोठा हादरा बसला आहे. बांग्लादेशी क्रिकेटर रुबेल हुसैन याला अभिनेत्रीशी रेप केल्या प्रकरणी अटक करण्यात आले.
ढाकाच्या एका मॅजेस्ट्रेटने हुसैनला ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. या पूर्वी १९ वर्षांच्या नाजनीन खख्तर हॅप्पी हिने गेल्या महिन्यात या क्रिकेटर विरुद्ध 'रेप' आणि लग्नाचे खोटे वचन दिल्याचा आरोप केला होता.
कोर्टाच्या या निर्णयामुळे २४ वर्षीय हुसैन यांचे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये सहभागावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
ढाक्याचे पोलीस उपायुक्त अनिसूर रहमान यांनी सांगितले की, '' मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने त्याचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी होत नाही तोपर्यंत त्याला जेलमध्ये पाठविण्यात आले आहे. पुढील सुनावणीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
पोलिसांनी गेल्या आठवड्यात हॅप्पीच्या तक्रारीची चौकशी सुरू केली होती. नाजनीनने तक्रार दाखल केली की या जलद गती गोलंदाजासोबत जवळचे संबंध होते, त्याने लग्नाचे आमिष दाखवले पण आता तो लग्न करण्यास नकार देत आहे.
तक्रार ऐकल्यानंतर नाजनीन आणि हुसैन यांची डीएनए चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान नाजनीनने पत्रकारांना सांगितले की, जर रुबेल तिच्याशी लग्न करण्यास तयार असेल तर ती हे प्रकरण मागे घेऊ शकते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.