लंडन : विम्बल्डन स्पर्धेत भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झानं ऐतिहासिक कामगिरी केलीय. विम्बल्डन महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस या अव्वल मानांकित जोडीनं एलेना व्हेसनिना आणि एकॅटरिना माकारोव्हा या रशियन जोडीला हरवून महिला दुहेरीत विजय मिळवलाय.
सानिया मिर्झा- मार्टिना हिंगिस जोडीनं ५-७, ७-६ आणि ७-५ असा सामना जिंकला. सानियाचं हे पहिलंच विम्बल्डन ग्रँडस्लॅम असून अशी ऐतिहासिक कामगिरी करणारी सानिया मिर्झा ही पहिलीच भारतीय टेनिसपटू ठरली आहे.
सानियाचं महिला दुहेरीतील हे पहिलचं ग्रँडस्लॅम आहे. सानियानं आजवर मिश्र दुहेरीत तीन ग्रँड स्लॅम विजेतीपदं मिळवली आहेत. याआधी २०११ साली फ्रेन्च ओपनमध्ये सानियाला उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं होतं.
तर मार्टिनासाठी महिला दुहेरीचं हे दहावं ग्रँड स्लॅम ठरलं. तिनं याआधी दोनदा म्हणजे १९९६ आणि १९९८मध्ये विम्बल्डन महिला दुहेरीचं जेतेपद मिळवलं होतं.
Hearty congratulations @MirzaSania @mhingis on winning women's doubles in Wimbledon, @MirzaSania's achievement will inspire youth of India
— President of India (@RashtrapatiBhvn) July 12, 2015
दरम्यान, या महिला दुहेरीत जेतेपद मिळवून सानिया-हिंगिस जोडीनं ३ कोटी ३४ लाख रुपये एवढं बक्षीस मिळवलंय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सानिया मिर्झाचं ट्विटरवरून अभिनंदन केलंय.
Well played @mhingis & @MirzaSania. You played wonderful tennis & registered a fantastic win at @Wimbledon. We are proud & very happy.
— Narendra Modi (@narendramodi) July 12, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.