सेहवाग करू शकतो टीम इंडियात कमबॅक - बांगर

 भारताचा माजी सलामीवीर आणि तडाखेबंद फलंदाज वीरेंद्र सेहवागचे वय वाढत असले तरी तो पुन्हा टीम इंडियात पुनरागमन करू शकतो, असे किंग्ज इलेवन पंजाबचा मुख्य कोच आणि भारतीय टीमचा सहयोगी स्टाफ असलेला संजय बांगर म्हटले आहे.  बांगरने नुकतेच पुण्यात किंग्ज इलेवन पंजाबचे प्रशिक्षण शिबीर झाले त्यावेळी त्याने सेहवागला पाहिले आणि त्याचे आकलन केले. 

Updated: Apr 6, 2015, 05:52 PM IST
सेहवाग करू शकतो टीम इंडियात कमबॅक - बांगर title=

नवी दिल्ली  :  भारताचा माजी सलामीवीर आणि तडाखेबंद फलंदाज वीरेंद्र सेहवागचे वय वाढत असले तरी तो पुन्हा टीम इंडियात पुनरागमन करू शकतो, असे किंग्ज इलेवन पंजाबचा मुख्य कोच आणि भारतीय टीमचा सहयोगी स्टाफ असलेला संजय बांगर म्हटले आहे.  बांगरने नुकतेच पुण्यात किंग्ज इलेवन पंजाबचे प्रशिक्षण शिबीर झाले त्यावेळी त्याने सेहवागला पाहिले आणि त्याचे आकलन केले. 

आयपीएलमध्ये पंजाबचा पहिला सामना राजस्थान रॉयल्सशी १० एप्रिलला आहे. सेहवागने भारताकडून शेवटचा सामना मार्च २०१३ मध्ये खेळला होता. बांगरला सेहवागच्या राष्ट्रीय संघातून पुन्हा खेळण्याबाबत विचारले असतात, तो म्हणाला, हा निश्चित तो पुनरागमन करू शकतो. तो आपल्या फिटनेसवर खूप काम करीत आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. आम्ही काल मॅचच्या परिस्थितीनुसार सराव केला. त्यात तो खूप चांगला वाटला. या वेळी आपण सेहवागला जसे ओळखतो तसा तो दिसत होता आणि क्रिकेट खेळत होता. 

सहवाग टीममधील नवा फलंदाज मुरली विजयसह सलामीला जाऊ शकतो. तसेच मनन व्होरा हा देखील ऑप्शन आहे. प्रत्येक खेळाडूला अंतीम ११ मध्ये समावेशासाठी चांगली कामगिरी करावी लागले. मग तो विजय असो वा वीरू.. जो दबावात चांगली कामगिरी करेल तसेच फॉर्म आणि फिटनेस दाखवले तो संघात स्थान मिळवू शकेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.