कोलकत्ता : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)चे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी विरोध केला नसता तर विराट कोहली तीन वर्षांपूर्वीच भारतीय संघाचा कर्णधार झाला असता असा दावा बीसीसीआयचे माजी निवड समिती सदस्य राजा वेंकट यांनी केला आहे.
मीडियासमोर आलेल्या काही रिपोर्टनुसार राजा वेंकट हे २०११-२०१२ या कालावधीत निवड समितीचे सदस्य होते. त्यांनी सांगितले की, २०११ च्या शेवटी आणि २०१२ ची सुरूवातीला ऑस्टेलिया दौऱ्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया अनेक गटात विभाजीत झाली होती. त्यामुळे निवड समितीतील अनेकांना धोनीच्या ऐवजी विराट कोहलीला कर्णधार पद देण्याची इच्छा होती. भारतीय संघात एकोपा राहण्यासाठी निवड समिती सदस्यांची तरूणाच्या हाती संघाचे नेतृत्व सोपविण्याची इच्छा होती.
या बातम्यानुसार वेंकट यांच्यानुसार टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला २०१२मध्ये टीमच्या बाहेर ठेवू इच्छित होते. पण तत्कालिन बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवास यांच्या प्रभावामुळे असे झाले नाही.
आम्ही तीन वर्षांपूर्वीच कोहलीला कर्णधार बनविण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही या संदर्भात प्रयत्नही केले होते. पण श्रीनिवासन यांच्यामुळे ते अयशस्वी ठरले. परदेशी दौऱ्यासाठी संघाची निवड ही बीसीसीआय अध्यक्षांच्या इच्छेविरूद्ध करू शकत नाही. त्यामुळे आम्हांला किती जरी वाटत होतं की कर्णधार बदलायला हवा, पण श्रीनिवासन कर्णधार बदलण्याच्या बाजूने नव्हते.
२०१०-२०११मध्ये देवधर ट्रॉफीमध्ये उत्तर विभागाचे नेतृत्त्व करताना कोहलीने आपले गूण दाखविले होते आणि सर्वांना प्रभावित केले होते. त्यावेळी आम्ही हेरले होते की आगामी काळात कोहली एक यशस्वी कर्णधार होईल. त्याने २००८ च्या अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये सिद्ध केले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.