ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट टीमची सुरक्षा वाढविली

सिडनी शहरात एका कॅफेमध्ये बंदूकधारी व्यक्तीकडून काही नागरिकांना ओलिस ठेवल्याची घटना घडल्यानंतर, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

PTI | Updated: Dec 15, 2014, 12:36 PM IST
ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट टीमची सुरक्षा वाढविली   title=

ब्रिस्बेन: सिडनी शहरात एका कॅफेमध्ये बंदूकधारी व्यक्तीकडून काही नागरिकांना ओलिस ठेवल्याची घटना घडल्यानंतर, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ब्रिस्बेनमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरी टेस्ट मॅच १७ डिसेंबरपासून खेळविला जाणार आहे.

बीसीसीआयचे सचिव संजय पटेल म्हणाले, की आम्ही सतत क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संपर्कात आहोत. खेळाडूंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, परिस्थितीचा आढावा घेत आहोत. ब्रिस्बेनमध्ये सर्व काही व्यवस्थित आहे. भारतीय टीमच्या सुरक्षेसाठी अधिक पोलीस जवान तैनात करण्याची मागणी आम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे केली होती. त्यानुसार त्यांनी सुरक्षा वाढविल्यानं आम्ही समाधानी आहोत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.